राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत खान्देश पहूर येथील गौरीचे यश

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तायक्वांदो  असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे आयोजित ३३ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत  खान्देश कन्या गौरी विजय कुमावत हीने चमकदार कामगीरी करत कांस्यपदकावर मोहर उमटविली आहे.

 

जामनेर तालुक्यातील पहूर येथील भूमीपुत्र विजय कुमावत यांची कन्या गौरीला बालपनापासूनच  तायक्वांदो खेळाची गोडी लागली .  पहूर येथील शौर्य स्पोर्टस् अकेडेमीत प्रशिक्षक हरिभाऊ राऊत यांच्याकडून तीने तायक्वांचे  शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आत्मसंरक्षणाचे धडे गिरविले. गौरीला खेळासोबतच शिक्षणातही तितकाच रस आहे . सध्या ती इंदिराबाई  ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत अध्ययन करत आहे . तीच्या या घवघवीत यशाबद्दल  सर्वत्र अभिनंदन होत असून पहूर गावाच्या शिरपेचात  मानाचा तुरा रोवला गेला आहे .

 

डावीकडून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई, अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, श्रीकृष्ण चौधरी, प्रशिक्षक हरीभाऊ राऊत यांनी मेडल देऊन केला सत्कार  करण्यात आला.

 

” आज मुलींनी स्व संरक्षणासाठी  तायक्वांदो सारख्या खेळाचे प्रशिक्षण घ्यायला हवे . मैदानावरील खेळामुळे शारीरिक सुदृढता तर येतेच , शिवाय अभ्यासातही मनाची एकाग्रता साधाता येते . खेळाच्या माध्यमातून  संरक्षण दलात अधिकारी होवून देश सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे.

– गौरी  विजय कुमावत, खेळाडू, पहूर .

Protected Content