भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय थायी बॉक्सींग स्पर्धेत भडगाव तालुक्यातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज नगरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठात नुकतेच थायी बॉक्सींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला. यात मुंबई ,पुणे,लातूर ,रायगड,जळगाव, इ. अशा विविध जील्यातून स्पर्धकांनी भाग घेतला होता .
यात भडगाव तालुक्यातील १६ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यातील लोकेश दिनानाथ पाटील (सुवर्ण पदक),जय अजय पवार (सुवर्ण पदक),निशांत भाऊसाहेब पाटील (सुवर्ण पदक),विशाल दिनेश चव्हाण(सुवर्ण पदक),सचिन नाना पाटील्(सुवर्ण पदक), आर्यन जुलाल सोनवणे (रौप्य पदक),हिताक्षी अभिजीत दायमा (रौप्य पदक),पायल निंबा भोसले (रौप्य पदक), दर्शन विठ्ठल पाटील (कास्य पदक) प्रथमेश अमित दायमा (कास्य पदक),जय सुनील हिरे (कास्य पदक), पियूष रवींद्र खैरनार (कास्य पदक),,निलेश नवल पाटील (कास्य पदक),जयेश संदीप पाटील (कास्य पदक),चेतन सुनील हिरे (कास्य पदक) ,दिपक रमेश चव्हाण (कास्य पदक) या स्पर्धकांनी यश संपादन केले आहे.
या सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी करत .त्यांच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन व खेळाडूना जळगाव जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन भडगाव जिल्हा अध्यक्ष हाजी जकिर कुरेशी; उपाध्यक्ष शाम पाटील व इतर संस्था पद अधिकारी डॉ.वसीम मिर्झा,सौरभ पाटील,संतोष पाटील ,सौरभ देशमुख,अजगर खान ,हाजी खलील शेख,युनुस अली सैयद व अबुजर खान राष्ट्रीय खेळाडू शाहरुख मणियार टिम कोच.विपुल भूपेंद्र साळुंखे व दिपक रमेश चव्हाण यांनी पंचाचे काम पाहिले.प्रशिक्षक अबरार खान यांचे मार्गदर्शन लाभले.ओडिसा येथे होणारी राष्ट्रीय थाई बॉक्सिंग ही स्पर्धा करिता निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान, भडगाव येथील शाहरुख मण्यार व आदेश शेपोंदे रायगड यांची थाई बॉक्सिंग च्या महाराष्ट्र कोच पदी नेमणुक करण्यात आली आहे सदर नेमणुक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नबीजी फरहान खान यांनी केली आहे.