पारोळा येथील डॉ. संकेत खरे यांना आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. संकेतकुमार खरे यांचा अहमदनगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने  “आरोग्य भूषण पुरस्कार 2023” गौरव करण्यात आला.

 

कौटुंबिक पार्श्वभूमी

डॉ. संकेत खरे यांनी पारोळा शहरासह तालुक्यात आपली वैद्यकीय सेवा दिली आहे. त्यांचे वडील स्व. बिपीनचंद्र खरे हे पारोळा शहरातील एक प्रसिध्द मेडीकल संचालक होते. आई वनमाला ह्या मंगरूळ येथील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापिका आहेत, त्यांची धर्मपत्नी डॉ. उत्कर्षा खरे ह्या दंतरोगतज्ञ असून  इगतपुरी येथील एसएमबीटी घोटी येथे प्राध्यापिका आहे. त्याची बहिण डॉ. मिताली ह्या एमडी आहेत तर  त्यांचे सासरे प्रतापराव पाटील हे जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी आहेत. अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने त्यांना कुटुंबाचा भक्कम पाठींबा आहे.

 

कोरोना काळात अनेकांना आप्त स्वकीय गमावले. योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. यात डॉ. संकेत यांचे वडील स्व. बिपीनचंद्र खरे यांचा देखील समावेश होता. त्याकाळात डॉ. संकेत हे मुंबई येथील सेव्हन हील्स या नामांकित रूग्णालयात कार्यरत असल्याने पारोळ्यात उपस्थित राहू शकले नाही. स्वत: वैद्यकीय क्षेत्रात असूनही आपल्या वडीलांसाठी आपण काहीही करू शकले नाही अशी खंत मनातआहे. या प्रसंगातून प्रेरणा घेत डॉ. संकेत खरे यांनी पारोळ्यात रूग्ण सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केलेल्या रूग्णसेवाची दखल घेत  सरपंच सेवा संघाच्या वतीने नुकतेच अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृहात मान्यवरांच्या हस्ते  “आरोग्य भूषण पुरस्कार 2023″ने गौरव करण्यात आला.

याप्रसंगी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, हवामान अभ्यासक पंजाबराव डक तसेच इतर मान्यवर यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content