फुटबॉल स्पर्धेत विवेकानंद कॉलेज, पोदार स्कूल विजेते

जळगाव प्रतिनिधी । आंतरशालेय १७ वर्षांखालील सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजने तर मुलींमधे पोदार इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकावले.

महापालिका व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे जिल्हा क्रीडा संकुलात महापालिकास्तरीय सुब्रतो मुखर्जी स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांच्या गटात स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजने अंतिम सामन्यात अ‍ॅड. बाहेती ज्युनिअर कॉलेजचा २-०ने पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. तर मुलींमधे पोदार इंटरनॅशनल स्कूलने अंतिम सामन्यात स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा २-०ने पराभव करत विजेतेपद पटकावले.

मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटात ९ संघांचा सहभाग होता. स्पर्धेत स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजचा आकाश पाटील व मुलींमध्ये रबाब तरवारी हे उत्कृष्ट खेळाडू ठरले. विजयी व उपविजयी संघाला जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इम्तियाज शेख यांची उपस्थिती होती. स्पर्धेत पंच म्हणून अब्दुल मोहसीन, तेजस मोरे, अभिषेक पहूरकर, अजय वर्चे, कौशल पवार, आकाश कांबळे, धनंजय धनगर, दीपक सस्ते, शुभ मुंदळा, पवन सपकाळे, संजय कास्देकर, अर्पित वानखेडे, गिरीश खोंडे, लियाकत अली यांनी काम पाहिले. या वेळी प्रा. रणजीत पाटील, छाया पाटील, प्रा. हरीश शेळके उपस्थित होते. प्रवीण ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. एम. एम. पाटील यांनी आभार मानले.

Protected Content