आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास करा-पीएसआय अमोल गर्जे

पहूर , ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विद्यार्थ्यांनी आपल्या शेतकरी – कष्टकरी आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास करावा असे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे  यांनी केले. महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते.

आज शनिवारी शाळेच्या चाणक्य सांस्कृतीक सभागृहात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर बोलताना त्यांनी पुढे सांगितले की , स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपल्याकडे गुणवत्ता असायला हवी , विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असून पोलीस दलातही आजपासून नियोजन करून तुम्ही अधिकारी बनू शकतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस ,  मुलींनी स्वतःच्या क्षमता तपासून विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवायला हवे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी विद्यार्थिनींनी इशस्तवन  स्तवन सादर केले . प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. .व्ही .घोंगडे यांनी केले . यावेळी शाळेतर्फे मान्यवरांचं पुष्पगुच्छ आणि स्नेहवस्त्र  देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी सौ . छायाताई गर्जे , उपमुख्याध्यापिका के. ए. बनकर , ज्येष्ठ शिक्षक बी. एन .जाधव यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन वर्ग शिक्षक शंकर भामेरे यांनी केले .आभार क्रीडाशिक्षक हरिभाऊ राऊत यांनी मानले.

Protected Content