धरणगाव चौफुलीला ‘श्री संताजी महाराज सर्कल’ नाव देण्याची मागणी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या धरणगाव चौफुलीला ‘श्री संताजी महाराज सर्कल’ असे नाव देण्यात यावे या मागणीचे निवेदन तेली समाजबांधवांच्या वतीने मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले.

नॅशनल हायवे वरील धरणगांव रोड लगत चौफुलीला ‘श्री संताजी महाराज सर्कल’ म्हणून मान्यता द्या. अशी मागणी तहसीलदार-उल्हास देवरे व मुख्याधिकारी नगरपरिषद पारोळा. यांना ही निवेदना द्वारे तेली समाज बांधवांनी केली आहे.

या   निवेदनात असे म्हटले आहे की या परिसरात तेली समाज बांधवांचा  सर्वाधिक वापर असून धरणगाव रस्त्याने तेली समाज बांधवांची ८० टके शेत जमीन याच सभोवतालच्या परिसरात असून,सदर सर्कलला श्री संताजी महाराज सर्कल या नावाने मंजुरी मिळाल्यास सदर नावने संबोधण्यात येईल, व वाचून मुखाने संताजीचे नाव घेण्यात येईल. म्हणून पुढील कार्यवाही करून मान्यता देण्यात यावी. अशी मागणी निवेदनांत करण्यात आली.

सदर निवेदन देते वेळी, माजी नगराध्यक्ष-कैलास चौधरी, भाजप शहराध्यक्ष-मुकुंदा चौधरी, माजी नगरसेवक-भैय्या चौधरी,माजी शिवसेनाशहर प्रमुख-अण्णा चौधरी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष-कपिल चौधरी, संताजी महाराज जगनाडे संस्थेचे अध्यक्ष-प्रविण चौधरी, मनोज भटू चौधरी, प्रल्हाद भिका चौधरी, सामाजिक कार्यकर्ते-अमृत नाना चौधरी, राजेंद्र गुलाब चौधरी, गोकुळ सुर्याजी चौधरी, तेली समाज पंच मंडळ व तेली समाज नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content