जिद्द, चिकाटी आणि परीश्रमानेच विद्यार्थ्यांना यशाची शिखरे गाठता येतील : हेमंत अलोणे

धरणगाव (प्रतिनिधी) : जिद्द, चिकाटी आणि परीश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण मिळत नाही. अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी जीवनात डाॅक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक जरुर बनावे मात्र प्रत्येकाने चांगला माणूस जरुर बनावे असे प्रतिपादन दै. देशदूतचे संपादक हेमंत अलोणे यांनी केले. येथील पी.आर.हायस्कूलच्या परानंद वार्षिक उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी होते.

यावेळी सर्व मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी चौधरी यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. एस. आर. बन्सी यांनी प्रमुख अतिथींचा परीचय करुन दिला. शासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या मागे न धावता उद्योजक होण्याचा सल्ला दिला. मोहन जैन यांनी पी.आर.च्या गौरवशाली परंपरेला उजाळा दिला. पर्यवेक्षक डाॅ. संजीवकुमार सोनवणे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून तयार झालेल्या विद्यालयातील कलावंताचा आढावा घेतला.

पी.आर.गीताचे अनावरण :

वर्धापन दिनाचे औचित्य साधत मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांनी लिहिलेले विद्यालयाचे पी.आर.गीत कोनशिलेचे अनावरण संपादक हेमंत अलोणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. एखाद्या विद्यालयाला आपले स्वतःचे गीत असणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे अलोणे यांनी या प्रसंगी नमूद करत प्रा.बी.एन.चौधरी यांचा गौरव केला.

या प्रसंगी धरणगाव न.पा.चे प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, जि. प. सदस्य प्रताप पाटील, गटनेता पप्पू भावे, उद्योजक सुरेशनाना चौधरी, जिवनसिंग बयस, राजेंद्र महाजन, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, अजय चव्हाण, सचिव डाॅ. मिलिंद डहाळे, संचालक अजयभाऊ पगारिया, सौ. निनाताई पाटील, राजेंद्र भाटीया, पुरुषोत्तम मकवाने, कांतिलाल डेडीया, अंकुश पाटील, अॅड. मोहन शुक्ला, ब्युरोचिफ भरत चौधरी, गटशिक्षणाधिकारी अमोल जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बाविस्कर, अशोक बिऱ्हाडे, मुख्याध्यापिका सौ. वैशाली पवार, सौ.संगीता अहिरराव, उपमुख्याध्यापक एस.एम. अमृतकर, शिक्षक पालक संघाचे सचिव सागर कासार, श्रीमती सुशिलाताई सोनवणे, कालूभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एस.एस.सी.परीक्षेतील गुणवंतांचा तसेच विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, सन्मान पत्र, स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले. सौ. रुपाली संचिती यांच्या शहिद नाटीकेने उपस्थितीतांची प्रशंसा मिळवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. आर. सपकाळे व एस.के.बेलदार यांनी केले. विद्यार्थीनींच्या चमूने ईशस्तवन, स्वागत गीत, पी. आर. गीत सादर केले. त्यांना सी.ए.शिरसाठ, नानाभाऊ पवार यांनी संगीत साथ दिली. तर आभार प्रदर्शन डी.एस.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.वाय.शिंदे, श्रीमती व्ही.एम.सोनवणे, डी. के. चौधरी, व्ही. एच. चौधरी, एम. डी. परदेशी, जे.डी.चौधरी, विलास पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Add Comment

Protected Content