जे.टी. महाजन अभियांत्रिकीतर्फे वेब कॉन्फरन्सचे आयोजन

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे १५ व १६ मे रोजी सायन्स इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयावर वेब कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, जेटी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फैजपूर आणि एसटीएएमआय म्हणजेच सोसायटी फॉर टेक्नॉलॉजिकल अ‍ॅडव्हान्स मटेरियल इंडिया सोबत संयुक्त विद्यमानाने १५ व १६ मे २०२० रोजी सायन्स इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयावर आंतरराष्ट्रीय वेब कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे या वेब कॉन्फरन्समध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक तज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. प्रो आर. पी. टंडन; प्रो. जिना हो हाँगकाँग: प्रो रत्तीकॉर्न थायलंड: डॉ विशाल शर्मा अमेरिका: डॉ नंदा,श्रीलंका: प्रो सिरील, फ्रान्स ,डॉ दिनेश रंगप्पा डॉ विशाल भारती पोर्तुगाल व भारतातील अनेक तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. या वेब कॉन्फरन्समध्ये नि:शुल्क नोंदणी असून इच्छुकांनी याचा जास्तीत जास्त विद्यार्थी व प्राध्यापकांनी लाभ घेण्याचे आवाहन जे. टी. महाजन अभियांत्रीकीतर्फे करण्यात आलेली आहे.

इच्छुकांनी या वेब कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी https://www.stami.in/IWCSET या लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content