यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल महाविद्यालयातील विद्यार्थी हे महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती गरजू नगरिंकापर्यंत पोहोचवणार आहेत. आदिवासीं विकास विभाग आणि यावल महाविद्यालय यांच्यात ३ वर्षासाठी उन्नतीसाठी युवा हाच दुवा असा सामंजस्य करार झाला आहे. यात शेकडो विद्यार्थी सहभागी होतील असे यावल महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी सांगितले.
प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे म्हणाले, यावल महाविद्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यात शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ ते २०२५ -२६ असा तीन वर्षाचा करार झाला आहे. यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूरे, वरिष्ठ लिपिक विकास पाटील, उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार , प्रा.ए.पी.पाटील, प्रा.संजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते. शासनाच्या आदिवासीं नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, पोर्टलवर संवाद, समाजमाध्यमे यांच्या मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.
शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या कल्याणकारी योजना जास्तीत – जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात साधारणतः हजाराहुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आदिवासी विकास विभाग यावल यांच्या पुढाकाराने अशा पध्दतीचा राज्यातिल हा पहिलाच उपक्रम असुन शासनासमवेत सामंजस्य करार केलेला आहे .महाविद्यालयातील जे विद्यार्थी उत्कृष्ठअमलबजावणी करतील अशा तिन विद्यार्थ्यांना निवडून त्यांना आदिवासी विभागाच्या वतीने सन्मानचिन्ह, पारितोषिक देवुन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे . सदर उपक्रमात सहभागी होणाऱ्या महाविद्यालयातील ३० लाभार्थी विद्यार्थ्यांनी आदीवासी विकास विभागाच्या योजना विषयी माहिती मिळवुन देण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ . संध्या सोनवणे आणी आदिवासी प्रकल्प विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी केले आहे .