यावल प्रतिनिधी । बारावीच्या परिक्षेत इलेक्ट्रॉनिक्स विषयात राज्यातून दुसर्या आलेल्या कु. रूकसाना गबाब तडवी या गुणवंत विद्यार्थीनीचा अॅड. देवकांत पाटील यांनी सत्कार केला.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील विरावली येथील राहणारी कु. रुकसना गवाब तडवी ह्या विद्यार्थीने बारावी विज्ञान शाखेत इलेक्ट्रॉनिक या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक तर नाशिक बोर्डात पहिला क्रमांकांने उतीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. या बद्दल विरावली गावाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील यांनी तिचा व तिच्या परिवाराचा सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या.
रूकसाना तडवी ही यावल मधील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील विदयार्थीनि असून
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने यश मिळवले आहे. तिची आई मोल मजुरी करत रुकसानाचे शिक्षण पूर्ण करत आहे. स्वतः घरातील सर्व कामे करून रोज शेतातील काम करून आईला मदत करून अभ्यास करत रूकसानाने यश मिळवले. तिला पुढे सायन्स विभागात डिग्री पूर्ण करावयाचे तिने सांगितले.
तिच्या या यशाबद्दल अॅड. देवकांत पाटील, साने गुरुजी माध्यमिक शाळेचे पर्यवेक्षक एम. के. पाटील, ग्रा. पं. सदस्य पवन पाटील, पवन राजपूत, गोकुळ पाटील, सुनील पाटील, संजू तडवी, सिकंदर तडवी, दिलीप निळे , प्रताप पाटील, तुषार पाटील व प्रकाश पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.