धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नांदेड येथील शेकडो तरूण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नांदेड गावातील शेकडो जणांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ना. पाटील यांनी या सर्वांचे स्वागत केले. दरम्यान, नांदेड ते बोरखेडा या चार किलोमीटर रस्त्यासाठी युवा सेना व नांदेड गावातील नागरिकांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. हा रस्ता पूर्वी कधीच झालेला नाही आणि गावातील दलित व आदिवासी बांधवांची वहिवाट या रस्त्याने आहे. रस्त्याभावी ते लोक शेती करण्याचा असमर्थ असल्याने हा रस्ता करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ हा रस्ता तयार करण्याची ग्वाही दिली.
युवा सेनेचे उपतालुकाध्यक्ष भरत.सैदाने ,उपजिल्हा संघटक भैय्या मराठे, नितीन पाटील बोरगाव , , मागासवर्गीय सेनेचे विभाग प्रमुख संजय मोरे, मागासवर्गीय शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, युवा सेना शाखा अध्यक्ष गोकुळ सैंदाणे, उपशाखा अध्यक्ष लखीचंद सैंदाणे, शेतकरी सेनेचे उपशाखा अध्यक्ष दत्तू कोळी, भटू सैंदाणे, अजीम मणियार, रमेश कोळी, रघुनाथ कोळी, दगा कोडी, दिलीप कोळी, प्रकाश भोई, बाळू कोळी, आणि नांदेड गावातील सत्संगी मंडळ, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.