काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वत:चं तोंड बंद ठेवा – निरूपमांचा राऊत यांना सल्ला

मुंबई ।  शिवसेनेनं बिहारमध्ये २२ जागांवर निवडणूक लढवली. त्यातल्या २१ जागांवर त्यांना नोटापेक्षा कमी मतं मिळाल्याचं ऐकून आहे. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वत:चं तोंड बंद ठेवा, असे माजी खासदार संजय निरुपम यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे. 

काँग्रेसनं चांगली कामगिरी केली असती, तर तेजस्वी यादव आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर काँग्रेसचे नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं बिहारमध्ये २२ जागांवर निवडणूक लढवली. त्यातल्या २१ जागांवर त्यांना नोटापेक्षा कमी मतं मिळाल्याचं ऐकून आहे. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वत:चं तोंड बंद ठेवा, अशी टीका निरुपम यांनी केली आहे.

Protected Content