कारण नसतांना लोखंडी वस्तूने वार; तरूण गंभीर जखमी

सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथे सामुहिक कार्यक्रमात कारण नसतांना एका तरूणाला लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी सावदा पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद मोईन सैय्यद सलीम वय २४ रा. बडाआखाडा सावदा ता. रावेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. बुधवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता बाजारपट्टा भागात सामुहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा सैय्यद मोईन हा देखील आलेला होता. त्यावेळी हैदर शेख मंजूर हा देखील त्या कार्यक्रमात आलेला होता. दरम्यान ईदर शेख मंजूर याने सैय्यद मोईन याच्याकडे कारण नसतांना रागाने पाहिले. याचा जाब विचारला असता हैदर शेख याने हातात लोखंडी वस्तू घेवून सैय्यद मोईन याच्या आंगावर उगारला.

हा वार वाचविण्याच्या प्रयत्नात असतांना लोखंडी वस्तू सैय्यद मोईन याच्या डोक्याला लागला. यात सैय्यद मोईन हा जखमी झाला. याप्रकरणी सैय्यद मोईन याने दिलेल्या फिर्यादीवरून हैदर शेख मंजूररा. बडाआखाडा सावदा ता. रावेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहून सानप हे करीत आहे.

Protected Content