यावल महाविद्यालयात तणतणाव मुक्त परिक्षा अभियान कार्यक्रम उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे ताणतणाव मुक्त परीक्षा अभियान कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे होते.

यावेळी महाविद्यालयचे उपप्राचार्य प्रा.एम.डी खैरनार यांनी आजचा विद्यार्थी परीक्षेच्या काळात सर्वात जास्त तणावात असतो.ज्याप्रमाणे आपण एखादा चित्रपट किंवा मालिका पाहतो व त्याची कथा पाठ करतो,त्यातील पात्रांचे भवितव्य व्यक्त करतो,त्याचप्रमाणे अभ्यासक्रम व  पुस्तकातील वाचलेलं लक्षात राहू शकते. त्याचे सातत्याने वाचन,चिंतन व मनन केले तर परीक्षेत समर्पक उत्तरे लेखन सोपे जाते, असे सांगितले.

अभ्यासासोबत घरातील वातावरण, योगासने, पुरेशी झोप या गोष्टी तणाव कमी करण्यास मदत करतात. परीक्षेत गैरप्रकार करून पास झालेला विद्यार्थी जीवनात यशस्वी होवू शकत नाही. कमी गुणांनी पास झालेले व उच्चपदापर्यंत मध्यम व गरीब कुटुंबातील विद्यार्थी पोहचले आहेत असे ते म्हणाले, प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपली सतत धडपड सुरू असते.

वेगवेगळ्या टप्प्यावर विविध परीक्षांना सामोरे जात असतो. अभ्यासाचे नियोजन,स्वतः नोट्स काढण्याची सवय, वेळेचा सदुपयोग,प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव या सोबतच ताणतणाव वाढविणाऱ्या आंतरजाल व मोबाईल, टीव्ही, चित्रपट आणि विचलित करणाऱ्या कट्ट्यावरील चर्चा नियंत्रित केल्यास परीक्षेत निश्चितच यश मिळेल असे सांगितले.स्व:कष्टाने मिळविलेले यश हे चिरकाल टिकणारे व प्रगतीपथावर नेणारे असते.परीक्षापूर्व तयारी शारीरिक,मानसिक व बौद्धिक क्षमता उत्तम असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

सूत्रसंचालन डॉ.एच.जी.भंगाळे यांनी केले तर आभार डॉ.आर.डी.पवार यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य प्रा. ए.पी.पाटील, डॉ.पी.व्ही.पावरा, डॉ. एस.पी.कापडे, प्रा.सी.टी.वसावे, प्रा.अनिल पाटील, प्रा.एन.डी.बोदडे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर आदी उपस्थित होते.

Protected Content