मुक्ताईनगरातील ज्यूनिअर कॉलेजात युवती सभेचे आयोजन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील जे.ई.स्कूल ज्यूनिअर कॉलेज येथे युवती सभेचे आयोजन करण्यात आले. यासाठी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे खेवलकर कार्यक्रमाच्या अधयक्षस्थानी होत्या. तसेच निधी ग्रुप ऑफ कंपनीच्या संस्थापक अध्यक्ष वैशाली विसपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

ऑटोमॅटिक सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन व सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनचे त्या  विद्यालय ,महाविद्यालयांमध्ये वितरण करत असतात” कापडमुक्त गाव”ही संकल्पना प्रभावी ठरली. नंतर आपल्या संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे. ” मुलींना मासिक पाळी” व” मासिक पाळीत घ्यावयाची काळजी  व समस्या” व त्याचे निराकरण याविषयावर मागदर्शन केले.त्याचबरोबर माऊली हॉस्पिटल रावेर, संचालिका डॉ. योगिता पाटील उद्घाटक म्हणून लाभल्या.

त्या बालरोग व नवजात शिशु तज्ञ आहेत आणि रावेर येथे गेल्या 20 वर्षापासून रुग्णांना सेवा देत आहे. कोरोना काळा सुद्धा त्यांनी जवळजवळ 5,700 छोट्या मुलांना आभासी निदान करून  जीवनदान दिले आहे. त्यांनी मुलींना “पोगांडा अवस्थेतून तरुण अवस्थेत पदार्पण करत असताना मुलींच्या शरीरात होणारे मानसिक ,शारीरिक,भावनिक बदल व आंदोलने याविषयावर सविस्तर मारगदर्शन केले. सौ. रोहिणीताईंनी मुलींना निडर ,निर्भया होऊन संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.ताईंनी अध्यक्षीय भाषणात मुलींना सांगितलं की महिलांनी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रांमध्ये प्रगती केलेली आहे राजकीय, सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक, सहकार क्षेत्र, धार्मिक, उद्योग, व्यापार व संरक्षण क्षेत्र असेल अश्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने आपल्या कार्याने कर्तुत्वाचा मेहनतीच्या जोरावर एक आगळा वेगळा असा ठसा उमटवलेला आहे.

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्यांनी अश्या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत,मुलींना अन्याय,अत्याचार विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे असे आव्हान केले.त्याच बरोबर Good Touch ,bad touch याविषयी सुद्धा जागृत केले आणि तुम्ही “माझ्या लाडक्या मुली”सावित्रीच्या लेकी म्हणून मुलींचा उल्लेख केला .तुमच्या समस्या माझ्या समस्या असा उल्लेख करत मी तुमची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अशा आश्वासन दिले. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि अशा मध्येच ज्युनिअर कॉलेजमध्ये युवती सभेचे आयोजन म्हणजे खऱ्या अर्थाने या मुलींना ऊर्जा,उत्सव  नवचैतन्य निर्माण करणारा हा कार्यक्रम ठरला .मुळात या कार्यक्रमाचा विषयच” सन्मान नारीचा”असा होता.

सर्व प्रथम ढोल ताशांच्या गजरात व  फटकण्याच्या आतिष बाजित स्वागत करत या कुमरिकानी या कर्तुत्ववान महिलांचं औक्षण केलं फुले व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे, गर्ल्स कॉमन रूमचे उद्घाटन करण्यात आले. माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ॲड. रोहिनी खडसे खेवलकर यांची महाराष्ट्र राज्य ,राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.त्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष नारायणदादा चौधरी व संचालक पुरुषोत्तमभाऊ महाजन , उपप्राचार्य,पर्यवेक्षक उपस्थित होते.त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रे व व्यासपीठ महिलांकडे सोपविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना महाजन मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राणे मॅडम यांनी केले. युवती सभेचे आयोजन उपशिक्षक विष्णू राणे सर यांनी केले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बंधु- भगिनींनी सहकार्य केलं..सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी प्राचार्य ,उपप्राचार्य पर्यवेक्षक सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content