जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील काट्याफाईल भागात बुधवारी दोन गटात तुफान हाणामारी होवून दंगल झाली. यावेळी पोलीसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याने दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. याप्रकरणात १३ संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेते आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जळगाव शहरातल्या शनीपेठ भागातील काट्याफाईल परिसरात बुधवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला. त्यानंतर रात्री २ वाजता पुन्हा या वादाचे रूपांतर दोन गटात हाणामारी होवून दंगलीत रूपांतर झाले. यात एकमेकांमध्ये दगडफेक आणि दारूच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय शेलार, योगेश माळी आणि मुकुंद गंगावणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटातील तरूणाचा आवरण्याचा प्रयत्न केला, परंतू गटातील काही जणांनी पोलीसांच्या दिशेने दगडफे केली. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी मुकुंद गंगावणे गंभीर जखमी झाले. त्यानंतर इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून जमावाला पांगवापांगव केली.
शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी मुकूंद मोगल गंगावणे यांच्या फिर्यादीवरून दगडफेक करणाऱ्या १८ जणांपेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शहजाद खान सलिम खान उर्फ लल्ला (वय २५), शाकिब खान सलिम खान (वय ३५), आसिफ खान इब्राहिम खान (वय ४५), नजिम खान नईम खान (वय ४१), अर्षद सईद मलिक (वय २३), हुजेफ अब्दुल वाहब मलिक (वय २५), शाकिर सईद मलिक (वय ३०), नदिम मलिक (वय ४५, सर्व रा.काट्याफाईल, शनिपेठ , जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील काही अल्पवयीन देखील आहे. जखमी झालेल्या पोलीसांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.