Home Cities अमळनेर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
34


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ४ एप्रिल रोजी ८ ते बुधवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान, मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने खाटेवर अल्पवयीन मुलगी झोपलेली असतांना फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवार ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत गायकवाड करीत आहे.


Protected Content

Play sound