दुकानदार व सेल्समनमध्ये तुफान हाणामारी; शहर पोलीसात परस्परविरोधात गुन्हे

जळगाव प्रतिनिधी । नुतन मराठा महाविद्यालयजवळील एका आईस्क्रीम पार्लर दुकानदार व सेल्समन यांच्या हमरी तुमरी होवुन एकमेकांना मारहाण व नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, रायसोनीनगरातील रहिवासी उमेश शांतीलाल कुमावत (वय-३७) हे अरुण आईस्क्रीमवर कामाला आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या दुकानावर हँटसन ग्रो कपंनीचा सेल्स ऑफीसर असल्याचे सांगत त्याने लवकर आईस्क्रीमची आर्डर द्या असे म्हणत वादाला सुरवात झाली. वादाचे पर्यावसन हाणामारीत होवुन दोघांनी एकमेकांला मारहाण करत जिवेठार मारण्याच्या धमकी दिली. या वादात दुकानातील संगणकाचे नुकसान झाले. दोघांनी परस्पर विरुद्ध तक्रार दिल्यावरुन जळगाव शहर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.

 

Protected Content