जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील खासगी उर्दू माध्यमाच्या अनुदानित शाळेत प्रवेशाच्या नावावर पालकांची होत असलेली आर्थिक लुट थांबविण्यात यावी, या मागणीचे निवेदन पालकांनी गुरूवार ९ जून रोजी सकाळी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील उर्दू माध्यमाच्या अनेक खासगी अनुदानित शाळा आहेत. ग्रामीण भागासह तालुक्यातून नोकरीच्या निमित्ताने मुस्लिम समाज बांधव जळगाव शहरात राहत आहे. समाजाच्या तुलनेने शहरातील उर्दू शाळा कमी पडत आहे. याचा गैरफायदा घेवून शहरातील जवळपास सर्व उर्दू माध्यमाच्या अनुदानित खासगी शाळांचे व्यवस्थापन मुलांच्या प्रवेशासाठी मोठी रक्कम मागितली जात आहे. प्रवेशाच्या नावाखाली पालकांची मोठी आर्थीक लूट कली जात आहे. ६ ते १४ वर्षाच्या मुलांना मोफत व सक्तिचे शिक्षण देण्याचा शासनाचा कायदा आहे. असे असतांना पालकांकडून मोठी आर्थीक लुट केली जात आहे. या निवेदनाची दखल घेवून शहरातील खासगी उर्दू शाळाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी कादरिया फाउंडेशन अध्यक्ष फारुक कादरी, अमन एजुकेशन सोसायटी अध्यक्ष शाहिद अली, जननायक फाउंडेशन सचिव फरीद खान, समाज सेवक जिया बागवान, कांग्रेस अल्पसंख्यक आघाडीचे महानगराध्यक्ष अमजद पठान, समाज सेवक फाइन पटेल, तमापुर फाउंडेशन मतीन पटेल यांच्यासह पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.