जामनेर प्रतिनिधी | येथील पोलीस स्थानकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या साठवलेल्या बायोडिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरात अवैघ बायोडिझेलचा साठा करून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलीस स्थानकाला मिळाली होती. यानुसार पथक तयार करण्यात आले. या पथकाने शहरातील मलीकनगर मधील कैफ डिस्पोजल या दुकानात सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. याप्रसंगी प्रत्येकी २०० लीटर क्षमतेचे १३ बॅरल आणि एक विद्युत पंप असा ऐवज आढळून आला. या बॅरल्समध्ये बायोडिझेल असून त्याला विक्री करण्यासाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. हे बायोडिझेल सुमारे १ लाख ९२ हजार रूपयांचे आहे.
पोलीस पथकाने ही सामग्री जप्त केली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.