Home क्राईम स्वामी समर्थ किराणा दुकानात चोरी करणारा जेरबंद

स्वामी समर्थ किराणा दुकानात चोरी करणारा जेरबंद

0
146

पहुर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर बस स्थानक परिसरात हाकेच्या अंतरावर असलेल्या कृषी पंडित कॉम्प्लेक्समधील स्वामी समर्थ किराणा दुकानातून रोकडसह किराणा सामान चोरीस गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली असून आरोपीस ताब्यात घेत त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर घटनेचा पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असतांना गुप्त माहिती मिळताच पो.हे. कॉ. ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, कुमावत यांनी संशयित आरोपी रोहित दिपक थोरात वय 22 याला बस स्थानक परिसरात अटक केली असता त्याच्या जवळ रोकड मिळून आली आहे. सदरील आरोपीला जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीचा तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. प्रकाश पाटील हे करीत आहे.

 


Protected Content

Play sound