नाकाबंदीत देशीदारूचा साठा जप्त; दोन जणांवर वनविभाग व पोलीसांची संयुक्त कारवाई

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैद्यरित्या दारूची विक्री करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री वनपरिक्षेत्र आणि पोलीस विभागाच्यावतीने जळगाव मार्गावरील कोळन्हावी फॉरेस्ट तपासणी नाक्यावर नाकाबंदीत वाहनांच्या तपासणीत एका दुचाकीधारकाकडून सव्वा लाखांचा देशीदारूचा साठा जप्‍त करण्यात आला आहे.

धानोराकडून बजाज कंपनीची मोटार सायकल क्र. (एमएच १९ डीटी ८५९२) या दुचाकी वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता त्यांचेकडे देशी दारू टॅंगो कंपनीच्या ९६ बॉटल (१८० एमएल) चे ६७ हजार २०६ मिळून आल्याने मोटरसायकल क्र. (एमएच १९ डीटी ८५९२) किंमत १ लाख २५ हजार. रूपयांच्या आरोपी प्रवीण अशोक सोनवणे रा. धानोरा, पुना गंगाराम चारण रा. चोपडा यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम सुनिल भिलावे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईत वनरक्षक योगेश सोनवणे, अक्षय रोकडे, रविकान्त नगराडे,चेतन शेलार, वनसेवक श्री. किरण पाटील, राजू निकम तसेच यावल पोलीस स्टेशनचे हवालदार नरेंद्र बागुले, कॉन्स्टेबल मुकेश पाटील,हितेश बागुल,परमेश्वर जाधव हे अधिकारी/कर्मचारी सहभागी होते. या गुन्ह्यातील दोघ संशयीत आरोपींना पोलीसांनी वतीने ताब्यात घेण्यात आले आहे

Protected Content