भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेला निवेदन (व्हिडीओ)

जळगाव संदीप होले । जळगाव शहरातील निमखेडी शिवार परिसरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी महापालिकेकडून कोणतेही उपाययोजना होत नसल्याने त्वरीत कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाटीकाश्रम निमखेडी शिवारातील रहिवाशी यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील गट नंबर १०८ व १०९ मधील वाटीकाश्रम परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून १० ते १५ मोकाट व भटक्या कुत्र्यांचा जमाव होवून येणार्‍या जाणार्‍यांना त्रास होत आहे. या कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांच्यासह नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, वरिष्ठ नागरिक तसेच महिला घराबाहेर निघू शकत नाही तसचे या कुत्र्यांमुळे लहान मुले कमालीचे धस्तावले आहेत. याशिवाय या कुत्र्यांमुळे परिसरामध्ये सर्वत्र घाणच घाण होते. या घाणीमुळे दुर्गंधी येते व आजाराला निमंत्रण दिले जाते. तरी महानगरपालिकेच्या विभागाने अशा मोकाट व भटक्या कुत्र्यांवर त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर साहेबराव माळी, दीपक गुंजाळ, दिगंबर पाटील, भारती मराठे, मीना देवरे, हेमलता चौधरी, राणी मेटकर, स्मिता कोष्टी, संध्या मिसे, संगीता पाटील, नीता पाटील, वैष्णवी मेटकर, शोभाबाई भोई, चंद्रकांत वाघ, सपना सोनवणे, ज्योती भोई, त्रिवेणी खैरनार, मनीषा पाटील, सुजाता महाजन यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/358039902157267

 

Protected Content