चाकूहल्ला करून फरार असलेल्या संशयिताला जळगावातून अटक

जळगाव प्रतिनिधी । तरूणाला चाकू मारून फरार असलेल्या गुन्हेगारास जळगावातील रामेश्वर कॉलनीतून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी यावतमाळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावतमाळ जिल्ह्यातील बोरगाव पुंजी येथे जिल्हा परिषद शाळेजवळ १५ जुलै २०२१ रोजी अमोल लक्ष्मण खंडारे आणि राजेंद्र काशीराम पवार (वय-२०) हे दोघे दुपारी १ वाजता शाळेजवळ बसले होते. त्यावेळी अमोल खंडारे यांचे आजोबा  त्याठिकाण आले व तु येथे बसून गांजा का पितो असे बोलून रागावले व आजोबा तेथून निघून गेले. त्यावेळी अमोल यानेच आजोबांना गांजा पित असल्याचे संशयावरून राजेंद्र पवार याने अमोलच्या पोटात चाकू भोसकले आणि तेथून फरार झाला होता. दरम्यान अमोल आई शोभार खंडारे यांच्या फिर्यादीवरून घाटजी जि. यावतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी राजेंद्र पवार हा फरार होता. दरम्यान, जळगाव शहरातील  रामेश्वर कॉलनी परिसरात नागसेन कॉलनी संशयित आरोपी राजेंद्र पवार राहत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना मिळाली. त्यानुसार पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. साईनाथ मुंढे यांनी संशयित आरोपी राजेंद्र पवार याला अटक केली. पुढील कारवाईसाठी यावतमाळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Protected Content