एमबीएच्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी थांबविण्याबाबत निवेदन

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरी जी.एच. रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीएच्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी घेवू नये या मागणीचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंटस युनियनच्या वतीने ॲड. अभिजित रंधे यांनी  आज महाविद्यालयाच्या संचालिका प्रिती अग्रवाल यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविद्यालयात MBA च्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची सेमिस्ट फी ही गेल्या वर्षी १ हजार १०० रूपये होती ती फि तुम्ही यावर्षी वाढवून ६ हजार २०० रूपयांपर्यंत केलल आहे. कोरोनाचया काळात शासनाने कोणत्याही महाविद्यालयाने शाळेची फी वाढवून नये असे आदेश असतांना आपल्या महाविद्यालयात फी मध्ये वाढ करून विद्यार्थ्यांसह पालकांवर आर्थिक बोजा टाकत आहात. दरम्यान, महाविद्यालयाची फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना परिक्षेला बसता येणार नाही असेही महाविद्यालयाचे व्यवस्थापकांकडून उत्तर दिले जात आहे. विद्यार्थ्यांकडून कोणत्या प्रकारची फी आणि पैसे भरण्याचा दबाव टाकू नये. यावेळी ऍड.अभिजित रंधे , उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमेटीचे सचिव दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Protected Content