यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेचे सेवानिवृत्त विद्युत कर्मचारी निळकंठ यादव यांना सातव्या वेतन आयोगाची संपूर्ण रक्कम मिळावी, यासाठी विविध स्तरावर वारंवार मागणी करण्यात आली. दरम्यान, यादव यांच्या पत्नीला किडनीचा आजार असून, काही बरेवाईट झाल्यास मृतदेह नगर परिषदेत ठेवण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावल नगर परिषद मध्ये हिशोबनीस कर्मचारी कार्यकरणारे व सेवानिवृत्त झालेले व निळंकठ शंकरराव यादव यांनी मागील १५ दिवसापासुुन यावल नगर परिषद मुख्याधिकारी , जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविलेल्या तकार निवेदनात म्हटले आहे की, मी यावल नगर परिषद मधील ईलेक्ट्रीक विभागात हिशोबनिस म्हणुन कर्मचारी होते व आता सेवानिवृत्त झालो असुन माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघता मुलगा हा देशसेवेच्या रक्षणाचे सिमेवर कार्य करीत असुन, माझी पत्नीला किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. याशिवाय मला देखील हृदयविकाराचा त्रास असल्याने सद्य परिस्थितिला आपले कुटुंब हे आर्थिक संकटात ओढवले गेले असुन देशाचे सिमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबास आपल्या हक्काच्या पैशांसाठी अशा प्रकारे त्रास सोसावे लागत आहे. मला व माझ्या पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी पैशांची अत्यंत गरज असतांना यावल नगर परिषद कडे आपणास मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाची रक्कम मिळावी यासाठी अनेक वेळा मागणी अर्ज नगर परिषदला दिला असुन त्याचा आजपर्यंत काहीही उपयोग झालेला नाही.
अशा परिस्थितीमध्ये माझ्या पत्नीचा गंभीर आजारातुन उपचाराअभावी मृत्यु झाल्यास यास पुर्णपणे नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार असुन , आपल्या पत्नीचा अशा अवस्थेत काही एक मृत्यु झाल्यास आपण तिचा मृतदेह हे नगर परिषद समोर आणुन ठेवणार आहे. यावल नगर परिषदचे कार्यरत असलेले अकाउंटन (हिशोबनिस ) यांच्याकडून माझा मानसिक छ्ड करण्यात येत असल्याचे ही निळकंठ यादव यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे.