सर्वत्र बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी करण्याबाबत निवेदन

अमळनेर प्रतिनिधी । स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची उद्या (दि.२३ जानेवारी) रोजी जयंती आहे. त्यानिमित्त सर्व शासकीय कार्यालय येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करावी, असा शासन निर्णय आहे तरी त्यानिमित्ताने अमळनेर तालुका तहसीलदार, कृषी विभाग ऑफिस कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, पाणी पुरवठा विभाग अमळनेर, गट विकास अधिकारी अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.

तसेच, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात यावे तसेच बाळासाहेबांच्या प्रतिमेचा फोटो सुद्धा देण्यात आला आहे. यासाठी अमळनेर तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

त्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख डॉक्टर राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय, नगरसेवक प्रताप शिंपी, पाटील माजी जिल्हाप्रमुख नाना ठाकूर, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, सरपंच सुरेश पाटील, चंद्रशेखर भावसार देवेंद्र देशमुख, मोहन भाई, जीवन पवार, प्रमोद शिंपी, उमेश अंधारे, रामचंद्र परब विक्रम टेलर रमेश पाटील, टिनू बोरसे, आनंता निकम आणि बाळासाहेब पवार यांच्यासह आदी उपस्थितीत होते.

 

Protected Content