जळगाव प्रतिनिधी । कलाकारांच्या कामाला गती मिळावी व त्यांना काम मिळावं, अशा मागणीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
आज शहरातील बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी भेट दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील, कलाकारांच्या हक्कसाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे सांस्कृतिक जिल्हा अध्यक्ष गौरव लवंगले व बाकी सर्व पदाधिकारी व कलाकार मंडळी उपस्थित होते.
तसेच ममता तडवी ,जळगाव महानगर सरचिटणीस अर्चना कदम, महानगर चिटणीस उज्वला शिंदे, महानगर चिटणीस आशा अभुरे, महानगर चिटणीस मगर ताई, महानगर कार्यकारणी सदस्य ह्या वेळी उपस्थित होत्या. योगेश पाटील यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देउन कलाकाराची दखल घेउन कामाचे नियोजन केले आहे.