पाचोऱ्यात तेली महासंघातर्फे प्रांताधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  उद्‌यपूर (राजस्थान) येथील हत्याप्रकरणी गुन्हेगारांना फासावर लटकवा, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व पाचोरा प्रदेश तेली महासंघातर्फे आज पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले.

उदयपुर (राजस्थान) येथील घंटाघर पोलिस स्टेशन अंतर्गत मालदास स्ट्रीटवर टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या कन्हैयाकुमार यांची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या अतिशय क्रुर घटनेचा निषेध करत दोषींना फाशी देण्यात यावी, पिडीत कुटुंबियांना पुर्ण संरक्षण देण्यात यावे, पिडीत कुटुंबियांना आवश्यक ती पुर्ण आर्थिक मदत द्यावी, पिडीत कुटुंबातील तरुण मुलाची हत्या झाल्याने पिडीत कुटुंबाला पुढील संपूर्ण जीवण जगण्यासाठी व त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व पाचोरा प्रदेश तेली महासंघातर्फे आज दि. ३० जुन रोजी पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले.

सदरचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या श्रीमती साळुंखे यांनी स्विकारले. तसेच धरिला मागण्या त्वरित मान्य न झाल्यास समस्त तेली समाज तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा ही प्रशासनास देण्यात आला आहे. निवेदन देते प्रसंगी प्रदेश तेली महासंघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष सतिष चौधरी, युवा आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदिप चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे अध्यक्ष संजय चौधरी, पाचोरा शहर तेली समाज मंडळाचे सचिव शांताराम चौधरी, प्रा. सी. एन. चौधरी, राजेश सपकाळे, नितीन चौधरी उपस्थित होते.

Protected Content