बोढरे येथे एनजीओ स्थापनासंदर्भात चर्चासत्र

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथे सामाजिक संस्थेची स्थापना व्हावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. दरम्यान, बुधवार रोजी चर्चासत्राचे आयोजन येथील जिल्हा परिषदेत करण्यात आल्यानंतर लवकरच आता मुहूर्त सापडणार असल्याचे उघड झाले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथे सामाजिक संस्थेच्या स्थापनेसाठी गावातील शासकीय व निमशासकीय तरुणांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत होते. परंतु काही कारणात्सव बैठक हि पुढे ढकलण्यात येत असे. मात्र गावाच्या यात्राचे औचित्य साधून तरुनांनी बुधवार रोजी चर्चासत्राचे आयोजन जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले. यावेळी  विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जसे की, अनाथ मुलामुलींच्या शिक्षणास हातभार लावणे, विधवा महिलेस आर्थिक मदत करणे. महिन्यातून एकदा विध्यार्थांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करणे. दर पंधरवड्यात स्वच्छता मोहीम राबिविणे, विध्यार्थांना भेडसावणाऱ्या समस्याचे निराकरण करणे व इतरही चर्चा यावेळी करण्यात आली. बोढरे गावाचा भूमिपुत्र व शिक्षक वासुदेव चव्हाण यांच्या संकल्पेतून सामाजिक संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. येत्या काही दिवसातच झूम मिटिंगद्वारे आणखी एकदा संवाद साधण्यात येणार असल्याचे वासुदेव चाव्हाण यांनी सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता देविदास जाधव, शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भीमराव जाधव, शिक्षक वासुदेव चव्हाण, एमएसफ जवान किरण जाधव, सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र परदेशी, अविनाश राठोड, अशोक राठोड, विलास जाधव, सुरेश राठोड, अर्जुन देवरे, अविनाश चव्हाण, व राजू राठोड आदी उपस्थित होते.

 

Protected Content