आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत आदिवासी विकास परिषदचे निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वस्तीगृह चोपडा येथे उर्वरित मुला-मुलींना तात्काळ प्रवेश देण्यात यावा . शासकीय आदिवासी मुलांचे नवीन व जुने वस्तीगृह चोपडा येथे १ooo विद्यार्थी संख्याचे मंजूर करण्यात यावा. शासकीय आदिवासी मुलींसाठी ५०० संख्याचे असलेले वस्तीगृहची ईमारत चोपडा येथे मंजुर करण्यात येवुन त्वरीत बांधण्यात यावी.  शासकीय आदिवासी मुलांचे नवीन वस्तीग्रह चोपडा येथे परमानंद शिपाई व सफाई कामगार यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी.  शिक्षण शास्त्र महाविद्यालय चोपडा येथील सन२०२२ ते २३ तात्काळ शिष्यवृत्ती देण्यात यावी. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दहिवद येथील मुख्याध्यापक शिरसाट  यांनी मुलांना केलेल्या जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांना निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावे. शासकीय आदिवासी मुला-मुलींना एम एस सी आय टी व टायपिंग या योजने चा लाभ देण्यात यावा.शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीग्रह चोपडा येथे गाद्या बेडशी चादर नवीन उपलब्ध करून देणे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत येणाऱ्या सर्व इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लक्ष देण्यात, शासकीय आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४वर्गातील कर्मचारी यांना तात्काळ रोजंदारी आदेश देण्यात यावे. भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेज चोपडा येथील विद्यार्थिनींच्या सन२०१८ते २०१९ ची शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात.शासकीय आदिवासी नामांकित इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी २०२३ते २४ ही यादी लावण्यात यावी. अशा समस्यांचे निवेदन देण्यात आले असुन आदिवासी विकास प्रकल्प विभागाकड्डन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्याकडे करण्यात आली.

याप्रसंगी प्रकल्प आधिकारी अरुण पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर आरिफ तडवी, जेकराम बारेला, स्वप्निल बारेला, नामा पावरा, दिनेश पावरा, करण बारेला, तय्यब तडवी हे उपस्थित होते.

Protected Content