अश्लिल चाळे करत तरूणीचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या २४ वर्षीय तरूणीसोब‍त अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी जळगावातील एकावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, पाचोरा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या २४ वर्षीय तरूणी ही जळगाव शहरातील एका भागात वास्तव्याला आहे. सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पुंडलीक काशीराम पाटील याने तरूणीला अंगावर ओढून अश्लिल चाळे करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता संशयित आरोपी पुंडलीक काशीराम पाटील रा. जळगाव याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण जगदाळे करीत आहे.

Protected Content