जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. परंतू प्रभारी कुलसचिव यांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. त्यांनी विद्यापीठातर्फे समज पत्र देण्यात यावे अशी मागणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशनच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जननायक बिरसा मुंडा यांची सोमवार १५ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय इमारत तळमजला जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.आर. एन. शिंदे हे संविधानिक पदावरील अधिकारी असताना देखील ते जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले नाही. प्रभारी कुलसचिव यांची ही कृती आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारी आहे. त्यामुळे प्रा.आर. एल. शिंदे प्रभारी कुलसचिव यांनी आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करणारे पत्र संघटनेला देण्याबाबत आणि अशा प्रकारे महापुरुषांचा अपमान होणार नाही त्याची लेखी स्वरूपात समज देण्यात यावी, अशी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशनच्या वतीने कुलगुरू यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनावर संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव अरुण सपकाळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष विकास बिऱ्हाडे, कोषाध्यक्ष सुभाष पवार, सहसचिव सुनील आढाव, वसंत वळवी, सविता सोनकांबळे, चंद्रकांत वानखेडे, सुनील सपकाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.