Home Cities एरंडोल एरंडोल तालुका दुष्काळ जाहीर करण्याबाबत राष्ट्रवादीचे निवेदन

एरंडोल तालुका दुष्काळ जाहीर करण्याबाबत राष्ट्रवादीचे निवेदन


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एरंडोल तालुका दुष्काळी जाहीर करावा व ग्रामीण भागातील लोडशेडिंग कमी करावे तसेच शेतकरी प्रोत्साहन अनुदान व विमा मिळावा या मागण्यांसाठी एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कचेरीवर माजी मंत्री सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी जि प सदस्य रोहन पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र देसले, संतोष महाजन, कपिल पवार, राजेंद्र शिंदे, विकास पाटील, ईश्वर पाटील, कमलाकर पाटील, संदीप वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound