जळगाव मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे आरक्षणासाठी निवेदन

जळगाव प्रतिनिधी ।  मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जळगाव मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदनव्दारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे. मुस्लिम हा इस्लाम धर्माचा एक समूह आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाचे ५ टक्के शैक्षणिक आरक्षण मान्य केले होते त्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे की, मुस्लिम आरक्षणात धर्माचा अडसर नाही. महाविकास आघाडीच्या सरकारला मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीने आरक्षणासाठी वेळीवेळी निवेदनही दिले आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे एजाज मलिक, एमआयएमचे सनेर सय्यद, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमजद पठाण, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख फिरोज शेख, मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे आवेश खाटीक, मन्यार बिरादरीचे फारुक शेख, सिकलगर बिरादरीचे अन्वर खान, कादरिया फाउंडेशनचे फारुख काद्री, जावेद शेख, सादिक शेख, मोबीन शेख, इमरान खान, सरफराज शेख, गुलाम गौस खान, इमरान शाह, साजिद शेख, फैज़ान शेख, एरंडोलचे नगरसेवक असलम पिंजारी, आरिफ मिस्त्री आदी उपस्थित होते.

 

Protected Content