जळगाव (प्रतिनिधी) शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत शनिवारी उपांत्यपूर्व सामन्यात अत्यंत धक्कादायक निकाल लागले. गोंदिया ने मुंबईचा सडन डेथमध्ये ६ – ५ तर बुलढाण्याने नागपूरचा १-० ने पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तर दुसरीकडे कोल्हापूरने अमरावतीचा सरळ पराभव करीत ३-० ने तर पुणे संघाने ठाणे संघावर ५-० ने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्यपूर्व सामन्यांचे निकाल
■कोल्हापूर विरुद्ध अमरावती यात कोल्हापूर संघाने अमरावतीचा ३-० पराभव केला प्रतीक्षा मिताली हीने दोन तर सारिका चौगुले हिने एक गोल केला.
■ दुसऱ्या सामन्यात पुणे विरुद्ध ठाण्यामध्ये पुण्याच्या संघाने पाच शून्य ने विजय प्राप्त केला त्यात पूजा वाघिरे ने २,रीतू , मूरिअल व हर्षा ने प्रत्येकी एक गोल नोंदविले.
■ तिसरा सामना अत्यंत चुरशीचा झाला. त्यात पहिल्याच हाफ मध्ये बुलढाणा ने बारा मिनिटात नागपूरवर गोल करून सन सनाटी निर्माण केली. नागपूर संघाने शेवटपर्यंत अत्यंत जोरदार प्रयत्न करून सुद्धा नागपूर संघाला बुलढाण्याची बरोबरी करता आली नाही व १-० ने बुलढाणा संघाने हा सामना जिंकला. वास्तविक पाहता मागील वर्षाचा नागपूर जिल्हा हा विजेता संघ होता.
■चौथा सामना हा न भूतो न भविष्यती असा झाला. मुंबईविरुद्ध गोंदिया यात पहिल्या हाफमध्ये कोणी संघ गोल करू शकला नाही. दुसऱ्या हाफमध्ये सुद्धा कोणताही संघ गोल करू शकला नाही. वास्तविक पाहता मुंबईच्या संघाचे सर्व नियोजन गोंदियाने फारच फरकाने तोडले. गोंदिया संघाने अत्यंत चांगल्या पद्धतीने मुंबई संघाला फाईट दिली व अंतिम वेळेपर्यंत दोघी संघ गोल करू शकले नाही, म्हणून हा सामना टायब्रेकरवर घेण्यात आला.
टाय ब्रेकरवर दोघी संघांनी पाच तीन असे गोल केल्याने पाचपैकी तीन गोल केल्याने त्यांना सडन देथ देण्यात आली. सडन देथमध्ये सुद्धा दोघेही संघांनी चार प्रयत्न देण्यात आले तेव्हा गोंदिया संघ एक शून्य ने विजय ठरला. गोंदियाची राणू उईके हिने शेवटचा गोल नोंदवून विजयश्री आपल्या जिल्ह्याच्या नावे केली.
उत्कृष्ट खेळाडू व पारितोषिक वितरण
कोल्हापूरची सोनाली साळवे, पुण्याची पूजा वाघीरे,बुलढाण्याची ऐश्वर्या बोंडे, तर गोंदियाची खुशबू चौरसिया या चार खेळाडूंना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला. तर उत्तेजनार्थ बक्षीस अमरावतीची पायल चंदेल, मुंबईची केरन पॅस,व गोंदिया ची रानू उईके अशा तीन खेळाडूंना बास्केट बॉलचे आंतरराष्ट्रीय पंच वाल्मीक पाटील, बॅडमिंटनचे प्रशिक्षक किशोर सिंग,अॅड. महेश भोकरीकर ,अॅड. रूपाली भोकरीकर, सेंटर रेल्वेचे थॉमस डिसोजा, रनर ग्रुपच्या वेदांती किरण बच्छाव, नूतन मराठा कॉलेजचे प्राचार्य एल.पी. देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष मोहम्मद आबिद यांच्या हस्ते देण्यात आली.
शनिवारी होणारे उपांत्य फेरीचे सामने
■शनिवारी सकाळी आठ वाजता कोल्हापूर विरुद्ध पुणे
■साडेनऊ वाजता बुलढाणा विरुद्ध गोंदिया हे उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहे.
या स्पर्धा जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन द्वारा आयोजित करण्यात आल्या आहेत. जळगावकर क्रीडाप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हान फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.