शेंदुर्णी प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर महाबळेश्वर येथे नुकतेच संपन्न झाले.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल ,विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख व कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी जामनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी पक्ष संघटना वाढीसाठी आपले विचार मांडतांना शरद पवार यांनी संपुर्ण राजकीय जीवनात सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय, ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र भरातील प्रत्येक मतदारसंघात शरद रथ यात्रा राबवावी ही संकल्पना मी मांडली असता राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात उपस्थित सर्वांनी या संकल्पनेचे स्वागत करून अनुमोदन दिले असून शरदचंद्र पवार यांनीही नोंद घेतली.
शिबिरात एकमताने शरद रथ यात्रा या संकल्पनेचा ठराव संमत करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील, भुसावळ उपाध्यक्ष राहुल वाघ उपस्थित इत्यादी होते.