शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे पहिल्यांदा जिल्ह्यात आगमन झाले. या दौऱ्यात त्यांनी प्रथम शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
श्रींचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या वतीने मंत्री ॲड.फुंडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेगांवमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली. तसेच बारी समाज विकास मंडळद्वारा आयोजित उपवधू-वर महोत्सवात उपस्थित राहून त्यांनी विवाहासाठी जोडीदार शोधणाऱ्या वधू-वरांना सुखद व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॅा. संजय कुटे उपस्थित होते.
“संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या आशीर्वादाने नवीन जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडण्यासाठी आत्मबल आणि ऊर्जा मिळाली. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत, जनसेवा व लोककल्याणाचा वसा कायम ठेवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला. शेगावच्या पवित्र भूमीने मला नवचैतन्य आणि प्रेरणा दिली आहे,”अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राज्याचे कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी आज लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या श्री सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पसमधील समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.