मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी अंतुर्ली व कुऱ्हा येथे राष्ट्रीयकृत स्टेट बँकेच्या शाखांची निर्मिती करण्यात यावी यासह विविध विषयांसंदर्भात संबंधित बँकेचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा आमदार चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली.
सेंट्रल बँक आणि भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांच्या अनेक अडचणी लक्षात व येत्या खरीप हंगामात पीक कर्जाच्या वाढीव तरतुदी करणे, पीक विमाच्या रकमा तात्काळ अदा करणे, के.सी.सी अकाऊंट क्लिअर करणे तसेच शेतकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी अंतुर्ली व कुऱ्हा येथे राष्ट्रीयकृत असलेल्या स्टेट बँकेच्या शाखांची निर्मिती करण्यात यावी अशा विविध विषयांवर संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा करीत तसेच भ्रमणध्वनीवरून बँकेच्या रिजनल मॅनेजर यांच्याशीही आमदार चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली.
मुक्ताईनगर तालुका हा ८३ गावांचा समावेश असलेला व भौगोलिकदृष्ट्या विचार करता तालुका ठिकाणाहून ५० ते ६० किलोमीटर अंतरावर शेवटच्या टोकातील गावं आहेत. तसेच तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असल्याने पीक कर्ज, के.सी.सी व इतर शेती विषयक कर्ज यांचे सेंट्रल बँकेत ३५ हजार खातेदार आहेत तर स्टेट बँकेत २२ हजार खातेदार आहेत. त्यामूळे सदरील बँकेत इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या खातेदार ग्राहकांना सुविधा पुरविण्यास तोकड्या कर्मचाऱ्यांकडून शक्य होत नसल्याने शेतकरी वर्ग बँकेच्या खातेदारांना व्यवहार करताना अनेक अडचणी येत आहे.
याकरिता तात्काळ कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि अंतूर्ली व कुऱ्हा येथे नव्याने बँकेच्या शाखांची निर्मिती करण्यात यावी. तसेच येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज, पाईप लाईन कर्ज व इतर शेती विषयक कर्ज योजनांची तरतूद करण्यात यावी. अतिरिक्त ग्राहक सेवा केंद्र निर्मिती करण्यात यावी. अशा विविध विषयांवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केल्या तसेच बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून महत्वपूर्ण सूचनादेखील केल्या.
यावेळी शिवसेना विभाग प्रमूख महेंद्र मोंढाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, स्विय सहायक प्रशांत पाटील व संचालाल वाघ, दशरथ पाटील, उमेश पाटील, नितीन पाटील, दिलीप पाटील यांचेसह शेतकरी बांधव उपस्थित होते.