मंगरूळ सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला

पारोळा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मंगरूळ विविध कार्यकारी सोसायटीच्या १२ जागांसाठी चुरसीच्या लढतीत १२ ही जागांवर विजय मिळवत मंगरूळ सोसायटीवर शिवसेनेने भगवा फडकविला आहे.

 

दि. १७ एप्रिल रोजी मंगळूर विविध कार्यकारी सोसायटीची १२ जागांसाठी निवडणुक घेण्यात आली. या सर्वच्या सर्व्ह १२ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहे. यात महिला राखीव मतदारसंघातुन मंगलबाई रामकृष्ण पाटील व निर्मलाबाई आबाजी पाटील, इतर मागसवर्गीय मतदारसंघातुन हेमराज गंजीधर पाटील, अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातुन केवळबाई बापु सोनवणे , सर्वसाधारण मतदारसंघातुन भरत सोनु पाटील, सुनिल अभिमन पाटील, उदयलाल सुकलाल पाटील, बापु ताराचंद पाटील, भगवान बन्सिलाल पाटील, भरत येवलकर पाटील, सदाशिव हिलाल पाटील व गोरख देवराम पाटील यांनी विजय संपादन केला. या सर्व विजयी उमेदवारांचा आमदार चिमणराव पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, पारोळा बाजार समिती मा.उपसभापती मधुकरआबा पाटील, शेतकी संघ व्हाइस चेअरमन नाना पाटील, मा. व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, संचालक राजेंद्र पाटील, दिपक वसंतराव पाटील, अशोक मोहनराव पाटील, येवलकर धनजी पाटील, रावसाहेब काशिनाथ पाटील, दिलीप भास्कर पाटील, सुरेश अभिमन पाटील, सुशिल पाटील, समाधान भास्कर पाटील, राकेश सुरेश पाटील, दत्तु गोपीचंद पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content