सातबारा ऑनलाईन सर्व्हर त्वरीत सुरू करा ; जळगाव तालुका तलाठी संघाचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी ।  सातबारा उताऱ्यात ऑनलाईन फेरफार करणारे सर्व्हर महिन्याभरापासून बंद असल्यामुळे महसुलचे मोठ्या प्रमाणावर कामे प्रलंबित आहेत. आणि पी.एम.किसान योजनेच्या कामाचा मोबदला तत्काळ द्यावा या मागणीसाठी जळगाव तालुका तलाठी संघातर्फे निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेलया महिन्याभरापासून ऑनलाईन सातबारा साठी वापरले जाणारे सर्व्हर कार्यालयीन वेळेत तसेच दिवस रात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामकाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. यासाठी खातेदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात वरिष्ठांना वारंवार माहिती देवूनही कारवाई होत नसल्यामुळे आज ३ मार्च रोजी निवेदन देण्यात येत आहे. ४ मार्च पर्यंत सर्व्हरमध्ये दुरूस्ती न झाल्यास ५ मार्च रोजी तालुक्यातील सर्व तलाठी डीएससी उपकरण एकत्रितरित्या जळगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात येईल पुढील परिणामास मंडळाधिकारी जबाबदार राहतील, तसेच केंद्र सरकारने पी.एम. किसान योजना महाराष्ट्रात महसुल यंत्रणा यांच्या मार्फत दिवसरात्र करून तलाठी यांनी सदर योजणेची अमंलबजावणी केलेली आहे. योजनेच्या कामाचा अद्यापर्यंत कोणताही मोबदला मिळाला नसून तोही तत्काळ मिळावा अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर तलाठी रूपेश ठाकूर, भरत नन्नवरे, एम.पी.सोनवणे, आर.के. बाहरे, सी.एम.कोळी, रमेश वंजारी, नितीश व्याळे, सुधाकर पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content