यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल ‘आदीवासी प्रकल्प विकास एकात्मिक विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठीची सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू करावे’ या मागणीसाठी शिवसेना आदीवासी सेलचे यावल तालुका अध्यक्ष हुसैन जहाँगीर तडवी यांनी विभागाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी नितिता सोनवणे यांना निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील अनुसुधित जमाती मधील आदीवासी विद्यार्थ्यांसाठी सैन्य व पोलीस विभागातील भरतीपूर्व प्रशिक्षण स्पर्धा व परिक्षा सराव राबविण्यात यावे या निवेदन देण्यात आले. याबाबत शिवसेना आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष हुसैन तडवी यांनी यावल येथे जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जळगाव जिल्ह्यातील आदीवासी एकात्मिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २०२२ या वर्षा मध्ये होणाऱ्या सैन्य / पोलीस या भरतीपूर्वी स्पर्धा परिक्षा व भरती प्रशिक्षण सराव सत्र आपल्या विभागाअंतर्गत राबविण्यात यावे. त्याचबरोबर स्पर्धा परिक्षार्थांसाठी कार्यशाळा भराविण्यात यावी जेणेकरून ग्रामीण भागासह अतिदुर्गम क्षेत्रातील पाडयावंर व वस्ती राहणाऱ्या आदीवासी समाजातील तरुण व तरूणींना या उपक्रम याचा लाभ घेता येईल.” अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर शिवसेना आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष हुसैन जहाँगीर तडवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे, तालुका उपप्रमुख संतोष खर्च, शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, अल्पसंख्यांक विभागाचे तालुका संघटक, तालुका उप संघटक पप्पूजोशी, सागर देवांग, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, तालुका सरचिणीस योगेश पाटील, विवेक अडकमोल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.