जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने राणा क्रीडा व बहुद्देशीय संस्था संचलित फौजी भाई कॅरम क्लब समायोजित मरहून सईद मलिक यांच्या स्मुतीप्रीत्यर्थ तीन दिवसीय जळगाव जिल्हा मानांकन पुरुष ऐकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार २७ जुलै रोजी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष अब्दुल हाजी गफ्फार मलिक, शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष रंगनाथ पाटील, हाजी अजीज सालार यांच्या यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. २९ जुलै रोजी फायनल होणार आहे. जिल्हाभरातून ८० खेळाडू सहभागी होणार असून ८ विजेते निवडले जाणार आहेत.