कासमवाडी येथे नरेंद्र महाराज यांच्या सत्संग केंद्रास प्रारंभ(व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 08 04 at 5.09.01 PM

जळगाव, प्रतिनिधी | कासमवाडी येथील खोकली माता मंदिर येथे नाणीजधाम दक्षिणपीठाचे श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या सत्संग केंद्रास उत्साहात सुरुवात करण्यात आली. पंचमुखी हनुमान मंदिरापासून ते कासमवाडीपर्यत वाजत गाजत नरेंद्र महाराज यांचा नावाचा जय घोष करीत पालखी काढण्यात आली.

 

दिंडी  ध्वज पताका, भजन तसेच नरेद्र स्वामी यांच्या जय घोषात काढण्यात आली. यावेळी नरेंद्र महाराज यांची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या गाडीत ठेवण्यात आली होती. यामागे डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. तर काही महिलानी लेझीम खेळत होत्या. लेझीम खेळणारी चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर महिला भक्त हातात ध्वज घेऊन पावली खेळत होते. या संस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने गरिब महिलांना शिलाई मशीन, जनावरांना चारा, शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले जाते अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख तुकाराम यांनी दिली.

Protected Content