फैजपूर येथे सातपूडा पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

satpuda satkar

फैजपूर, प्रतिनिधी | येथील नावलौकीक प्राप्त असलेली सातपूडा अर्बन पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन नरेंद्र विष्णू वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेचे सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

 

सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. संस्थेने अल्पावधीत सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी केली असून आर्थिक विश्वास संपादन केला आहे. संस्थेकडे असलेला निधी व स्वमालकीची इमारत या बाबी लक्षात घेता संस्था मजबूत आर्थिक पायावर उभी आहे. संस्था सुमारे ३३ वर्षांपासून अखंड प्रगतिपथावर आहे. याबाबत सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा संस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी सभासदांसमोर सादर केला. तसेच गिरीश पाटील यांनी श्रद्धांजली चा प्रस्ताव मांडला. सभेस व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, संस्थापक चेअरमन प्रा. पाटील, संचालक नितीन चौधरी, हेमराज चौधरी, पांडुरंग दगडू सराफ, डॉक्टर पद्माकर पाटील, सुनील वाढे, प्रकाश चौधरी, श्रीमती वासंती चौधरी, मान्यवर केतन किरंगे, रामभाऊ पाचपांडे, किरण चौधरी, विजयकुमार परदेशी, अनिल नारखेडे, डॉक्टर प्रमोद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. व्हा चेअरमन चंद्रशेखर चौधरी यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन व्यवस्थापक राजेश कानडे यांनी केले. या वेळी सहा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक व अधिकारी विजयकुमार सावकारे व सभासद उपस्थित होते.

Protected Content