धान्य दुकानात तफावत आढळल्यास गुन्हा दाखल होणार – प्रांताधिकारी डॉ. थोरबोले

फैजपूर प्रतिनिधी । रेशन धान्यदुकाना गैरप्रकार आढळून आल्याने रावेर तालुक्यात तीन गुन्हे दाखल झाले आहे. धान्यदुकानावर तपासणीत अनियमितता, गैरप्रकार व तफावत आढळून आल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सांगितले.

रास्त भाव दुकानांतर्गत धान्य वाटप करणे, अवाजवी पैसे घेणे तसेच धान्य साठा हा प्रमाणात न असणे यावरुन रावेर तालुक्यात वाघोदा खु येथे 1 व सावदा येथे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यापुढेही आपणाकडून अशीच अनियमीतता आढळून आल्यास अथवा घरोघरी जावून जबाब घेतलेनंतर आपण गैरप्रकार केल्याचे उघड झाल्यास आपणावर आत्यावश्यक अधिनियमानुसार कारवाई तथा वेळप्रसंगी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी कळविले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत धान्य वाटप करावयाचे आहे. सदरचे धान्य हे जसजसे गोदामात प्राप्त होईल त्या प्रमाणे आपल्या स्वस्त धान्य दुकानात पोचविण्यात येईल. सदरचे धान्य हे पॉस मशिनवरील नमूद सदस्यांच्या प्रमाणात प्रत्येकी 5 किलो तांदूळ याप्रमाणात वितरीत करावयाचे आहे.

धान्य वाटपासंदर्भात दुकानदारांना दिल्या सुचना
1. पॉस मशिनवरील सदस्य व वितरीत करण्यात आलेले धान्य हे 5 च्या पटीतच असावे.
2. पॉस वरील धान्य व प्रत्यक्ष वितरीत करण्यांत आलेले धान्य यात तफावत नसावी.
3. नियमीत धान्य वाटपाव्यतीरीक्त मोफत धान्य वाटप करतांना पैशांची मागणी करु नये.
4. पॉस मशिनीची पावती व त्यामागे ग्राहकाचा मोबाईल क्रमांक नमूद करुन कार्यालयात सादर करणे हे
बंधनकारक राहील. मशिनची पावती निघू शकत नसल्यास कॅशमेमोचा वापर करण्यात यावा व पूर्ण वाटप
झालेनंतर संपूर्ण पावती ही कार्यालयात सादर करावयाची आहे.
5. दरमहा 10 तारखेपर्यंत नियमीत धान्याची वाटप करुन तद्नंतर मोफतच्या धान्याची वाटप करावी व ती 10
दिवासांत पूर्ण करावी.
6. त्याचप्रमाणे दुकान बंद च्या कालावधीत कार्यालयात येवून पुढील महिन्याचे चलन हे कार्यालयातून 15
तारखेपर्यत पास करुन भरणा करुन घ्यावा.

Protected Content