मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) आमचा उद्धवजींना राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याला विरोध नाही, त्याची जी घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. पण ते शक्यच नाहीय, घटनात्मकदृष्ट्या ते होऊच शकत नाहीत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घटनेवर बोट ठेवले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोट्यातून आमदार बनण्याला आक्षेप आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, माझा मुद्दा वेगळा आहे. अजूनही दोन महिने आहेत. दोन महिन्यानंतरच अशी स्थिती येईल की आमदार नाही झाले तर त्यांना (उद्धव ठाकरेंना) राजीनामा द्यावा लागेल. मग आता मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्याची काय गरज होती? आमचा उद्धवजींना राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याला विरोध नाही, त्याची जी घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. पण ते शक्यच नाहीय, घटनात्मकदृष्ट्या ते होऊच शकत नाहीत, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content