यावल येथे तिसऱ्या दिवशी ७४ उमेदवारी अर्ज दाखल

यावल प्रातिनिधी । तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक रणधुमाळीला वेग आला असुन आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसी एकुण ७४ इच्छूक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 

दरम्यान मागील तीन दिवसाच्या शासकीय सुटीच्या विश्रांतीनंतर दि.२८ डिसेंबरपासून पुनश्च ग्रामपंचायत निवडणुकीत नशिब आजमावणाऱ्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज तिसऱ्या दिवसी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयावर एकच गर्दी केली होती. यावल तालुक्यात एकूण ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुक दि.१५ जानेवारी रोजी पार पडणार आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दि. ३० डिसेंबरपर्यंत असुन ४ जानेवारी २०२१ रोजी उमेदवाराच्या अर्जांची छाणणी व त्याच दिवसी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकुण ७४जणांचे अर्ज प्राप्त झाले. यात सर्वाधीक उमेदवारी अर्ज ११ हे वड्री ग्रामपंचायत व १० अर्ज कोरपावली ग्रामपंचायती करीता दाखल झाले असून, बामणोद व बामणोदसाठी प्रत्येकी ९ उमेदवारी अर्ज , मोहराळे गृप , पिंपरूड , ग्रामपंचायती करीता ६ अर्ज , हिंगोणे , सांगवी बु॥ , प्रत्येकी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे . यात अंजाळे गृप , महेलखेडी , अट्रावल , मारूळ गृप , डोंगर कठोरा ,विरोदे , विरावली , डोणगाव या ग्रामपंचायतीकरिता प्रत्येकी १ उमेदवाराने आपले अर्ज दाखल केले आहे .कोळवद , पिपंरूड प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल असुन , किनगाव बु॥साठी ३ आणी नायगावकरीता ४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

 

 

Protected Content