Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

0
182


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्या नगर परिसरात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता समोर आले आहे. याबाबत रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही जळगाव शहरातील अयोध्या नगरातील नातेवाईकांकडून मामाच्या घरी आलेली होती. दरम्यान, शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मैत्रीणकडे जावून येते असे सागून मुलगी ही घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी आली नाही, त्यामुळे तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे करीत आहे.


Protected Content

Play sound