शाळा सुरू झाल्यात, आता बसेसही सुरू करा ! : कॉंग्रेसची मागणी

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजपासून शाळा सुरू झाल्या असतांना बसेस अभावी विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यात याव्यात अशी मागणी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

आज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागातील बससेस सुरू नसल्याने तेथून शिक्षणासाठी तालुक्यावर येणार्‍या विद्यार्थ्यांची कुंचबणा होणार आहे. या विद्यार्थ्यांना खासगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागणार असून यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असून ही पध्दत धोकेदायक देखील आहे.

या अनुषंगाने कॉंग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले आहे. मुलींसाठीच्या अहिल्याबाई होळकर बस सेवा तसेच केंद्राच्या मानव विकास योजने अंतर्गत असलेल्या सुविधांच्या बसेस तत्काळ सुरू करव्यात. शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांकरिता सुरळीत बस सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, एनएसयूआयचे प्रदेश सचिव चेतन बाविस्कर व तालुकाध्यक्ष सोहन सोनवणे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content